भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

तयाचिये भेटीं जावें उठाउठीं । कृपाळु जगजेठी उदार तो ॥१॥ पूर्वी उपमन्युसी क्षीरसागर दिधला । अढळपदीं ठेविला बाळ धुरु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तयालागीं ज्ञानी म्हणती नैमित्तिक पितृ श्राद्धादिक जाणावें तें ॥१॥ संतांचें दर्शन ज्ञानियाची भेटी । उत्थापन अटी करणें लागे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तरठ्या तरठ मारूं केला । बुडत्याचें डोई दगड दिला ॥१॥ तैसें जन्मोनियां प्राणी विषयांतें गेलें भुलोनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तरले संगती अपार । वाल्मीकादि हा निर्धार । पापी दुराचार । अजामेळ तरला ॥१॥ ऐसा संताचा महिमा । नाहीं आनिक उपमा । अनुसरलिया प्रेमा । तरताती निःसंदेह ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तरी सोहं नव्हे याग । सोहं नव्हे त्याग । आणि अष्टांग योग । सोहं नव्हे ॥१॥ सोहं नव्हे दान । सोहं नव्हे तीर्थ । मंत्रादि दीक्षित । सोहं नव्हें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तरुणी रजकी नूतन यौवनी । बैसली रुसुनी एकान्तासी ॥१॥ धुंडुनियां मातें धाडी सासुरिया । तो म्हणे मी राया ऎसा नोहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तापत्रयें तापलीया पंढरीसी यावें । दरुशनें मुक्त व्हावें हेळामात्रें ॥१॥ दुःखाची विश्राती सुखाचा आनंद । पाहतां चिदानंद विठ्ठल देव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तापलिया तापें शिणलीया मार्गीं । पोहे ठाकी वेगीं कृष्णकथा ॥१॥ कृष्णकथा गंगा सांवळें उदक । मना बुडी दे कां वोल्हावसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तापलीया तापत्रयें संतां शरण जावें । जीवेंभावें धरावें चरण त्यांचे ॥१॥ करुनि विनवणी वंदु पायवाणी । घालुं लोटांगणी मस्तक हें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ