भजनी मालिका
← भजनांकडे परत

तळीं पृथ्वीं वरी गगन । पाहतां अवघेंचि समान

talin pruthvin vari gagan | pahatan avaghenchi saman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तळीं पृथ्वीं वरी गगन । पाहतां अवघेंचि समान ॥१॥ रिता ठाव नाहीं कोठें । जगीं परब्रह्मा प्रगटे ॥२॥ स्थावर जंगम पहातां । अवघा भरला तत्त्वतां ॥३॥ भरुनीउरला दिसे । एका जनार्दनी हृदयीं वसे ॥४॥