भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरठ्या तरठ मारूं केला । बुडत्याचें डोई दगड दिला

tarathya tarath marun kela | budatyachen doi dagad dila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तरठ्या तरठ मारूं केला । बुडत्याचें डोई दगड दिला ॥१॥ तैसें जन्मोनियां प्राणी विषयांतें गेलें भुलोनीं ॥२॥ अंधाचें संगतीं । कोण सुख चालतां पंथीं ॥३॥ एका जनार्दनीं देवा । नोहें सांगात बरवा ॥४॥