भजनी मालिका
← भजनांकडे परत

तापलिया तापें शिणलीया मार्गीं । पोहे ठाकी वेगीं कृष्णकथा

tapaliya tapen shinaliya margin | pohe thaki vegin krushnakatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तापलिया तापें शिणलीया मार्गीं । पोहे ठाकी वेगीं कृष्णकथा ॥१॥ कृष्णकथा गंगा सांवळें उदक । मना बुडी दे कां वोल्हावसी ॥२॥ वोल्हावलें मन इंद्रियां टवटवी । गोपिराज जीवीं सांठविलें ॥३॥ सांठविलें जीवीं जाणा याची खुणा । जरी होय करुणा सर्वांभुतीं ॥४॥ सर्वांभूतीं राम दृष्टीचें देखणें । नाहीं दुजेंपणें आडवस्ती ॥५॥ आडवस्ती नाहीं एका जनार्दनीं । श्रीरामावांचुनी । आन नेणें ॥६॥