भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरले संगती अपार । वाल्मीकादि हा निर्धार । पापी दुराचार । अजामेळ तरला

tarale sangati apar | valmikadi ha nirdhar | papi durachar | ajamel tarala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तरले संगती अपार । वाल्मीकादि हा निर्धार । पापी दुराचार । अजामेळ तरला ॥१॥ ऐसा संताचा महिमा । नाहीं आनिक उपमा । अनुसरलिया प्रेमा । तरताती निःसंदेह ॥२॥ वेदशास्त्रें देती ग्वाही । पुराणें हीं सांगती ठायीं । संत्संगा वांचुनि नाहीं । प्राणियांसी उद्धार ॥३॥ श्रुति हेंचि पैं बोलती । धरावी संतांची संगती । एका जनार्दनीं प्रचीती । संतसंगाची सर्वदा ॥४॥