भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनापरती पंढरीये पेठ । उभा तो वैकुंठ विटेवरी

tribhuvanaparati pandhariye peth | ubha to vaikunth vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिभुवनापरती पंढरीये पेठ । उभा तो वैकुंठ विटेवरी ॥१॥ पहा चला जाऊं पंढरीये । नवस पुरती सये अंतरीचे ॥२॥ उभा विटेवरी घेऊनी बुंथी । शंख चक्र गदा पद्म हातीं शोभती ॥३॥ राहीं रुक्मिणी उभ्या दोही दोबाही । चामरें मयुरपिच्छ ढाळिती ठायीं ॥४॥ एका जनार्दनीं पहातां रुप । पाहतां पाहतां जालें मन तद्रूप ॥५॥