भजनी मालिका
← भजनांकडे परत

तोचि एक संसारीं । वाचे हरिनाम उच्चारी

tochi ek sansarin | vache harinam uchchari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तोचि एक संसारीं । वाचे हरिनाम उच्चारी ॥१॥ न करी आणिक पैं धंदा । नित्य आठवी गोंविदा ॥२॥ हरिनाम चिंतना । ज्याची रंगली रसना ॥३॥ एका जानर्दनीं संत । ज्याचें समाधान चित्त ॥४॥