भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेथें मुख्य हरिहर । शोभे चंद्रभागा तीर

tethen mukhya harihar | shobhe chandrabhaga tir

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तेथें मुख्य हरिहर । शोभे चंद्रभागा तीर ॥१॥ जाऊं चला पंढरपुर । भेटुं आपल्या माहेरा ॥२॥ आर्त सांगुं जीवींचा । पुनीत ठाव हाचि साचा ॥३॥ हरिहरां होय भेटीं । वास तयांसी वैकुंठीं ॥४॥ एका जनर्दनीं शरण । पंढरी पुण्यठाव भीवरा जाण ॥५॥