भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्राहित त्राहित त्राहित । विठ्ठल देव तो त्राहित

trahit trahit trahit | viththal dev to trahit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्राहित त्राहित त्राहित । विठ्ठल देव तो त्राहित ॥१॥ वेदवचनें निर्धार । नाम तारक हें सार ॥२॥ तारका तारका श्रेष्ठ । पुराणीं हा बोभाट ॥३॥ म्हणे जनार्दनाचा एका । नाम तारका हें देखा ॥४॥