भजनी मालिका
← भजनांकडे परत

तू म्हणशील बा हें माझें । वायां वाहसी वाउगें ओझें

tu mhanashil ba hen majhen | vayan vahasi vaugen ojhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तू म्हणशील बा हें माझें । वायां वाहसी वाउगें ओझें ॥१॥ सोडी दे टाकूनी परता येई । रामनाम वाचे सदा गाई ॥२॥ नामाचि जाण सत्य सार । वायां कां वाहशील भार ॥३॥ एका जनार्दनीं नाम सार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥४॥