भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

गोकुळीं कमळ विस्तारलें साचें ध्यान श्रीधराचें करावया ॥ यमुनेच्या पाबळीं मूर्ति देखिली सांवळी ।

चंचळ चांदिणें सोमविणें भासलें । तेज निमालें रविबिंबेंविणें ॥१॥ जगत्रजीवनु ह्मणे जगासी कारण । तें अणुप्रमाण तेथे दिसे ॥२॥

चतुरपणें चतुराननु पैं भागला । शिवुपणें शिवरुपु पैं जाहला ॥१॥ हरिपणें हरि अंग रिघाला । या तिहींचा मेळा न दिसे गे माये ॥ध्रु०॥