भजनी मालिका
← भजनांकडे परत

चक्राकार चक्ररुप चक्रधरु म्हणवी

chakrakar chakrarup chakradharu mhanavi

चक्राकार चक्ररुप चक्रधरु म्हणवी । पाहतां अंतरीं न दिसे कांही ॥१॥ पाहातां पाहातां मी परठाया गेले । तेथें एक देखिलें महदभूत ॥२॥ रखुमादेविवरु महदभूता वेगळा । त्याहुनि आगळा तो मनीं मानलागे माये ॥३॥