भजनी मालिका
← भजनांकडे परत

घनु वाजे घुणघुणा

ghanu vaje ghunaghuna

घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥ चांदवो चांदणें । चापेवो चंदनु । देवकी नंदनु । विण नावडे वो ॥२॥ चंदनाची चोळी । माझें सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥ सुमनाची सेज । सीतळ वो निकी । पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥ तुम्हीं गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावीं उत्तरें । कोकिळें वर्जावें तुम्हीं बाइयांनो ॥५॥ दर्पणीं पाहातां । रुप न दिसे वो आपुलें । बापरखुमादेविवर विठ्ठलें । मज ऐसें केलें ॥६॥