भजनी मालिका
← भजनांकडे परत

चतुरपणें चतुराननु पैं भागला । शिवुपणें शिवरुपु पैं जाहला

chaturapanen chaturananu pain bhagala | shivupanen shivarupu pain jahala

चतुरपणें चतुराननु पैं भागला । शिवुपणें शिवरुपु पैं जाहला ॥१॥ हरिपणें हरि अंग रिघाला । या तिहींचा मेळा न दिसे गे माये ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु तिहीं गुणां वेगळा । शक्ति नव्हे दादुला गे माये ॥२॥