भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

जटिल धुळधुसिर दोंदिल डोळसु अंगणीं बाळचंद्र खेळतां दिसे ॥ तें देखोनियां यशोदा माया पसरोनिया बाह्या ॥

जन्मोजन्मींच्या सायासीं । विठ्ठल लाधला पुंडलिकासी ॥१॥ पूर्वी पुण्य केलें वो माये । विटे लाधले या विठोबाचे पाये ॥२४॥

जयातें पाहतां परतला आगमु । निर्गमा नाकळे दुर्गमु । सिध्दांसाधक निरुतें वर्मु । न पडे ठायीं सर्वथा ॥१॥

जरासंदुमल्लमर्दनु तो । गजपित्राहटणु तो गे बाई ॥१॥ कुब्जकपान तो । सुदाम्या अनुसंधान तो गे बाई ॥ध्रु०॥