भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

जोडुनिया जोडी जेणें हूंडारिली दुरी । भिकेची आवडी तया नावडे पंढरी ॥१॥ करंटे कपाळ ज्याचें नाम नये वाचे । सदैव सभाग्य तोचि हरीरंगी नाचे ॥ध्रु०॥

ज्ञानविज्ञान हरि । नांदे आमुच्या घरीं । बाह्यजु अभ्यंतरी जाला देव ॥१॥ काय सांगूं माय । त्रिभुवन धाय । पाहातां न समाय । नाना रुपीं ॥ध्रु०॥

ज्याचें गुणनाम आठवितां मनचि नाहीं होय । अनुभवाचे पाय पुढें चालती ॥१॥ निर्गुणगे माय गुणवंत जाला । प्रतिबिंबीं बिंबतसे चैतन्याचें मुसे ।