भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचेनि तेजें तेजस रविग्रह

jyacheni tejen tejas ravigrah

ज्याचेनि तेजें तेजस रविग्रह । त्याचेनि मोह निरसती ॥१॥ तें नाम परिकर कृष्णचि सुंदर । वैकुंठींचे घर आम्हीं केलें ॥ध्रु०॥ जपतां नाम स्मरतां पैं हरि हरि । प्रपंच बाहेरी कृष्णनामें ॥२॥ निवृत्ति सांगे ज्ञाना कृष्णचि नयना । सर्वां सर्वत्र पान्हा कृष्णरुपें ॥३॥