भजनी मालिका
← भजनांकडे परत

तत्त्वमस्यादि वाक्यउपदेश

tattvamasyadi vakyaupadesh

तत्त्वमस्यादि वाक्यउपदेश । नामाचा अर्धांश नाहीं तेथें । ह्मणोनि नामसंकीर्तन करिता जवळी जोडलासि आतां । क्षणु न विसंबे जिवाचिया जीवना रया ॥१॥ नाम निजधीर गर्जती वैष्णव वीर । कळिकाळ यमाचे भार पळाले तेथें ॥२॥ म्हणौनि नाम वज्रकवच तोचि निर्गुणाचा अभ्यास । पाहेपां स्वप्रकाश विचारुनी । ऐसें सुंदर रुपडें ह्रदयीं धरिलें आतां । पाहातां केवि होये पुनर्योनि रया ॥३॥ ऐसा सकळां अकळ कळला । ह्रदयीं धरिला समता बुध्दी । बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतिता । तुटली जन्माची आधी व्याधी रया ॥४॥