भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठकपरी धरिला मनोवेगें बांधला

thakapari dharila manovegen bandhala

ठकपरी धरिला मनोवेगें बांधला । तो ठेंगणाचि जाहाला अनिवाड वो माय ॥१॥ समाधि ध्यान निजध्यासिं आरुढलें । तंव अवघेंचि पारुषलें अभाव वो माय ॥२॥ हा असो जैसा तैसा ह्रदयमंदिरीं ऐसा । परपुरुषीं अपैसा अनुसरलें वो माय ॥३॥ बरवा देखोनि न्याहाळीं दिव्य कांति झळाळी । परब्रह्मीं दिवाळी चहुदिशांची वो माय ॥४॥ त्यानें निवाला मनु भेटला जगजिवनु । तो आनंद सुख गहनु उचंबळे वो माय ॥५॥ हा निरालंब वोळवा भक्ति भावें मिळाला । रखुमादेवी दादुला विठ्ठल राणा वो माय ॥६॥