भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळधराच्या धारीं सिंधुजळ जयापरी

jaladharachya dharin sindhujal jayapari

जळधराच्या धारीं सिंधुजळ जयापरी । पुरोनिया उरे महावरीरे गोवळा ॥ तेजें शोकलें काई आणावया गेलें । तैसी नवल तुझी कुसरीरे गोवळा ॥१॥ चाळा लाउनि गोवितोसी दाउनियां लपसी । लपोनि केउता जासी तैसी माव न करी आम्हासिरे गोंवळा ॥२॥ वायु काय वोखट चांग विचारुनी वाजे । तयाविण कवण ठावो असे ॥ तो आपुलि चाडा करि कोडिवरी येरझारा । सेखीं गगनीं सामावला दिसेरे गोंवळा ॥३॥ आकाश तेंचि अवकाश तुजमाजि हें विश्व कीं तूं विश्वीं अससी । बापरखुमादेवीवरा विठ्ठला न बोले । तुझें वर्म बोलतां निकरा झणे जासीरे गोंवळा ॥४॥