भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री

janmajanmantarin asel punyasamugri

जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री । तरिच नाम जिव्हाग्रीं येईल श्रीरामाचें ॥१॥ धन्य कुळ तयाचें रामनाम हेंची वाचे । दोष जातील जन्माचे श्रीराम म्हणतांची ॥२॥ कोटीकुळाचें उध्दरण मुखीं राम नारायण । रामकृष्ण स्मरण धन्य जन्म तयाचें ॥३॥ नाम तारक सांगडी नाम न विसंबे अर्धघडी । तप केलें असेल कोडी तरिच नाम येईल ॥४॥ ज्ञानदेवीं अभ्यास मोठा नामस्मरण मुखावाटा । कुळ गेलें वैकुंठा हरि हरि स्मरतां ॥५॥