भजनी मालिका
← भजनांकडे परत

चहूं शून्याचा भेद कैसा पहावा देहीं

chahun shunyacha bhed kaisa pahava dehin

चहूं शून्याचा भेद कैसा पहावा देहीं । ब्रह्मरंध्री निसंदेहीं निजवस्तु ॥१॥ साकळें सकुमार बिंदूचे अंतरीं । अर्धमात्रेवरी विस्तारलें ॥२॥ त्रिकूट श्रीहाट गोल्हाट तिसरें । औठपिठादी सारे ब्रह्मांडासी ॥३॥ स्थूळ सूक्ष्म कारणी माया । महाकारणाच्या ठायां रिघ करा ॥४॥ निवृत्ति ज्ञानदेव उभयतांचे बोल । आकाश बुबुळीं पाहा असे ॥५॥