भजनी मालिका
← भजनांकडे परत

घोंगडी घेऊनि हाटासि जाये

ghongadi gheuni hatasi jaye

घोंगडी घेऊनि हाटासि जाये । पंढरिये आहे वस्ती आम्हां ॥१॥ घोंगडियाचें मोल पैं जालें । चरणीं राहिलें विठ्ठलाचे ॥ध्रु०॥ घोंगडें येक बैसलें थडी । उभयां गोडी विठ्ठलाची ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणे । शाहाणे ये खुणें संतोषले ॥३॥