भजनी मालिका

भजने

माथां मोरपिसें कुंडलें गोमटीं । कस्तुरी लल्लाटीं रेखिली दिसे ॥१॥ ह्रदयीं निकेतन श्रीवत्सलांछन । मूर्ती विराजमान शंख चक्र ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माथें टेंकित बाह्या पसरित । डांगाचे आधार घेती ॥ध्रु०॥ एक म्हणती आम्हीं उचलिला पर्वत ।

मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥१॥ एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सिद्ध करी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मान तोडावया कर शस्त्रांचे । कठिण बहुतांचे उभारिले ॥१॥ तरी न वदें न वदें आन । आन कांहीं या विठोबावांचून ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मानवा रामनामीं भजें । तेणें तुझें कार्य होतें सहजें ॥१॥ अनुभव घेई अनुभव घेई । अनुभव घेई रामनामीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मानसींच अर्थ मानसींच स्वार्थ । मानसें परमार्थ दृढ असे ॥१॥ मानसींच देव मानसींच भक्त । मानसींच अव्यक्त दिसतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मानसींच ध्यान मानसींच स्नान । मानसींच अर्चन करुं आम्हीं ॥१॥ न करुं साधन लौकिकापुरतें । न पुजूं दैवत आन वायां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥१॥ तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मानी भक्तांचे उपकार । रुणीया म्हणवी निरंतर । केला निर्गुणीं आकार । कीर्त मुखें वर्णितां ॥१॥ म्हणोनि जया जे वासना । ते पुरवितो पंढरिराणा । जाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मानूं कांहीं आम्ही आपुलिया इच्छा । ना तरि सरसा रंकरावो ॥१॥ आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम