भजनी मालिका
← भजनांकडे परत

मानवा रामनामीं भजें । तेणें तुझें कार्य होतें सहजें

manava ramanamin bhajen | tenen tujhen karya hoten sahajen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मानवा रामनामीं भजें । तेणें तुझें कार्य होतें सहजें ॥१॥ अनुभव घेई अनुभव घेई । अनुभव घेई रामनामीं ॥२॥ शंकारादि तरले वाल्मिकादि उद्धरले । तें तूं वहिलें घेईं रामनाम ॥३॥ एक जनार्दनीं नामाच्या परिपाठीं । दोष पातकें पळती कोटी ॥४॥