भजनी मालिका
← भजनांकडे परत

मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची

man ichchhi to apaman pave | amangal save abhagyachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥१॥ एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सिद्ध करी ॥ध्रु.॥ आधीं फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥ तुका म्हणे राजहंस ढोरा नांवे । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥३॥