भजनी मालिका
← भजनांकडे परत

मानी नामाचा कंटाळा । तया वोंगळा न पाहावे

mani namacha kantala | taya vongala na pahave

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मानी नामाचा कंटाळा । तया वोंगळा न पाहावे ॥१॥ सदा त्याचें विषयीं ध्यान । वाचे बोले भलते वचन ॥२॥ आलिया तो घरा । तया न द्यावा पैं थारा ॥३॥ ऐसा चांडाळ जन्मला । वायां भूमीभार पैं जाहला ॥४॥ एका जनार्दनीं निर्धार । तया थार नाहीं कोठें ॥५॥