भजनी मालिका
← भजनांकडे परत

मानूं कांहीं आम्ही आपुलिया इच्छा । ना तरि सरसा रंकरावो

manun kanhin amhi apuliya ichchha | na tari sarasa rankaravo

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मानूं कांहीं आम्ही आपुलिया इच्छा । ना तरि सरसा रंकरावो ॥१॥ आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥ध्रु.॥ तुका म्हणे आम्ही खेळों सहजलीळे । म्हणोनी निराळे सुख दुःखचा ॥२॥