भजनी मालिका

भजने

माडियेला खेळ हमामा हुंबरी । मारुनी हिरण्यकश्यपु प्रल्हाद खेळिया करी ॥१॥ हुतुतुतु हुमरी हुतुतुतु हुमरी ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

माडियेला डाव पोरा हुतुतुतुतु । नको घालुं फेरा पोरा हुतुतुतुतु ॥१॥ लक्ष चौर्‍याशींचा डाव खेळ मांडियेला । लक्ष जाणे तोचि तेंथोनि सुटला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मांडीवरी घेत यशोदा सुंदरी । आळवी श्रीहरी नाना युक्ती ॥१॥ तूंची माझ प्राण तूं माझी माउली । तूं माझी बहिणुली कान्हाबाई ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मांडे पुर्‍या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥१॥ ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मात कळों सरे पत्नीपुत्रा वेगें । पातलीसे दोघें रायापाशीं ॥१॥ गोंवियला राजा दिसे वेडा झाला । रानीं बोले तिला माग काई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माता पिता जन स्वजन कांचन । प्रियापुत्रीं मन गोवू नको ।। गोवू नको मन राघवेंवांचोनी । लोकलाज जनीं लागलीसे ।।

रचनाकार: संत रामदास

माता पिता बंधु कुळगुरु दैवत । सखा सर्व गोत केशिराजा ॥१॥ जन्मोनि पोसणा तुझा मी अंकिला । आणिकांचा पांगिला न करीं देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माता पिता बंधु भगिनी इष्टमित्र विठ्ठल तूं रे ॥धृ०॥ बापा यावें भेटावें विसांवा माझा गा तूं । माझा कुळाचार माहेर रे जिव्हार विठ्ठल तूं ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

माता म्हणे नामा राऊळाशी खेळतां । तुज कोण्या दैवता ओडियलें।।१।। लाजिरवाणें नाम्या तुवां केलें जिणें हांसती पिशुने देशोदेशीं ।। २ ।।

रचनाकार: संत गोणाई

माता म्हणे नामा राऊळाशीं खेळतां । तुज कोण्या दैवता ओढियलें ॥१॥ लाजिरवाणें नाम्या तुवां केलें जिणें । हांसती पिशुनें देशोदेशीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माता म्हणे प्रल्हादासी । वडिलें शिकविलें नायकशी ॥१॥ कांहीं नायकशी शिकविलें । विद्याभ्यास वहिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माता वाट पाहे नामा अजुनी कां नये । देखोन विठ्ठल काय भुलला तेथें ॥१॥ ऐसें मज पाहतां हेंचि घडे साचें । विठ्ठलीं मन त्याचें गुंतलें असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माता समाधान करी त्या बाळाचें । परि चित्त त्याचें गुतलें देवीं ॥१॥ मातेलागीं पुसे देव कोठें आहे । येरी म्हणे सबाह्य कोंदलासे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मातापितयांसी जो करी नमन । धन्य त्याचें पुण्य इह जगीं ॥१॥ मातापितयांचें करी जो पूजन । धन्य तयाचें पुण्य इहलोकीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ