भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातला बोकड भलत्यावरी धांवे । तैसा भरला विषय हावे

matala bokad bhalatyavari dhanve | taisa bharala vishay have

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मातला बोकड भलत्यावरी धांवे । तैसा भरला विषय हावे ॥१॥ नाठवेचि आपपर । सदा हिंडे परद्वार ॥२॥ शिकविलें मानी वोखटें । उताणा नेटें चालतसे ॥३॥ कर्म धर्म नावडेचि कांहीं । विषयप्रवाहीं बुडतसे ॥४॥ एका जनार्दनी तें पामर । भोगिती अघोर कुंभपाक ॥५॥