भजनी मालिका
← भजनांकडे परत

माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा

mata kapi gala | tethen kon rakhi bala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥१॥ हें कां नेणां नारायणा । मज चाळवितां दिना ॥ध्रु.॥ नागवी धावणें । तेथें साह्य व्हावें कोणें ॥२॥ राजा सर्व हरी । तेथें दुजा कोण तारी ॥३॥ तुझ्या केल्याविण । स्थिर वश नव्हे जन ॥४॥ तुका म्हणे हरी । सूत्र तुझ्या हातीं दोरी ॥५॥