भजनी मालिका
← भजनांकडे परत

मानामान संकल्प आशा । तुटला मोहजाळ फांसा

manaman sankalpa asha | tutala mohajal phansa

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मानामान संकल्प आशा । तुटला मोहजाळ फांसा ॥१॥ तया गुरुचियां भक्तां । नुरेचि कोठें गोंवा गुतां ॥२॥ संर्वातरीं आपुलें रुप । देखती नेणतां विकल्प ॥३॥ निळा म्हणे कर्मातीत । झाले होऊनि कर्मी रत ॥४॥