भजनी मालिका
← भजनांकडे परत

मानसींच अर्थ मानसींच स्वार्थ । मानसें परमार्थ दृढ असे

manasinch artha manasinch svartha | manasen paramartha drudh ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मानसींच अर्थ मानसींच स्वार्थ । मानसें परमार्थ दृढ असे ॥१॥ मानसींच देव मानसींच भक्त । मानसींच अव्यक्त दिसतसे ॥२॥ मानसींच संध्या मानसीं मार्जन । मानसी ब्रह्मायज्ञ केला आम्हीं ॥३॥ मानसी आसन मानसीं जनार्दन । एका जनार्दनीं शरण मानसींच ॥४॥