भजनी मालिका
← भजनांकडे परत

मानिसी देहाचा भरंवसा । केला जाईल नकळे कैसा

manisi dehacha bharanvasa | kela jail nakale kaisa

रचनाकार: संत सेना · अभंग
मानिसी देहाचा भरंवसा । केला जाईल नकळे कैसा ॥१॥ सार्थक कर हो कांहीं। जेणें हरी जोडे पायां ॥२॥ धनसंपत्ति पाही । ही तो राहील ठायीं ॥३॥ शरण रिघा पंढरिराया। सेना न्हावी लागे पायां॥४॥