भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरीचें पुरें काम । घेतां नाम विठोबाचे

antarichen puren kam | ghetan nam vithobache

रचनाकार: संत सेना · अभंग
अंतरीचें पुरें काम । घेतां नाम विठोबाचे ॥१॥ नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ॥२॥ पाहिले वेदांत। निश्चय केला निगमांत ॥३॥ सेना म्हणे न वेचा कांहीं। लाभ नाहीं या ऐसा ॥४॥