भजनी मालिका
← भजनांकडे परत

मानी भक्ताचे उपकार । म्हणोनि धरी अवतार

mani bhaktache upakar | mhanoni dhari avatar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मानी भक्ताचे उपकार । म्हणोनि धरी अवतार ॥१॥ उच्छिष्ट काढी धर्माघरीं । नीच काम करी गौळ्यांचें ॥२॥ अर्जुनाचें रथीं बैसे । सारथ्या सरसे करीतसें ॥३॥ एका जनार्दनीं अंकितपणें । द्वार राखणें बळींचें ॥४॥