भजनी मालिका

भजने

स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥ नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावें उदास । साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥ संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥१॥ आतां सोडवणे धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्थापक व्यापक सर्वदेशीं भरला । पाहतां तो भला पंढरीये ॥१॥ असोनियां नसे नसोनियां असे । योगिया हृदयीं वसे दृष्टीं न पडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्थिरावल्या वृत्ती पांगुळला प्राण । अंतरिची खूण पावोनियां ॥१॥ पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मिलित । कंठ सद्रदित रोमांच आले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

स्थूल देहाचा विचार । हातां आलिया साचार । तेथें देहें अहंकार । विरोनि जाये ॥१॥ स्थूल ब्रह्माज्ञान नेत्रीं । स्थूलभोग जागृति वैखरी । हें नव्हे मी ऐसा अंतरी । बोध झाला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें । मन हें बुडालें महासुखीं ॥ १ ॥ माझें रूप माझें विरालेसें डोळां । माझें ज्ञान सामाविलें माझें बुबुळां ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

स्थूळ ना सुक्ष्म कारण ना महाकारण । यापरता वेगळाचि जाण आहे गे जाय ॥१॥ पुंडलिकाचें प्रेमें मौनस्थ उभा । कोणा न बोले उगला उभा ठेला गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्नान दानाचें एक फळ । त्याहुनी नामाचें सुफळ । कोटी गुणें विशाळ । पुण्य हातां चढतसे ॥१॥ धन्य धन्य नाम श्रेष्ठ । गाय अखंड नीळकंठ । आणिक श्रेष्ठ श्रेष्ठ । नाम मुखीं जपताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्नानविधि केलियां भक्तीं । नाममंत्राचिया आवृत्ति । मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ति । विठोबची ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

स्नानाचा परिकळा स्वरवण अडथळा । सकळ मंत्री साचा पाहीं । आसनीं शयनीं भोजनीं गमनागमानीं । राम म्हणता दोष नाहीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ