भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्थिरावल्या वृत्ती पांगुळला प्राण । अंतरिची खूण पावोनियां

sthiravalya vrutti pangulala pran | antarichi khun pavoniyan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
स्थिरावल्या वृत्ती पांगुळला प्राण । अंतरिची खूण पावोनियां ॥१॥ पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मिलित । कंठ सद्रदित रोमांच आले ॥२॥ चित्त चाकाटलें स्वरुपामाझारीं । न निघे बाहेरि सुखावलें ॥३॥ सुनीळ प्रकाशें उदेजला दिन । अमृताचें पान जीवनकळा ॥४॥ शशीसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटणी आनंदाची ॥५॥ निळा सुखासनीं प्रेमेसी डुल्लत । विराजला निश्चित निश्चिंतीनें ॥६॥