भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्थूलदेह सूक्ष कारण तिसरा देह

sthuladeh suksha karan tisara deh

स्थूलदेह सूक्ष कारण तिसरा देह । चौथा महाकारण देह ऐक बापा ॥१॥ औट पीठाचे दरीं कर्पूर वर्णावरी । शामाचे अंतरी महाकारण ॥२॥ महाकारणीं आतुला लक्षाचा पुतळा । उन्मनी हे कळा दैवी वरी ॥३॥ सहस्त्रदळ तेंच कीं आन नाहीं ऐसें । महा तेज वसे ज्याचे आंत ॥४॥ पश्चिम मार्ग तेथुनी ऊर्ध्व उंच गगनी । जेथें एक कामिनी एकलीच ॥५॥ मार्ग नहीं तेथ कोणे रीती जावें । सुषम्नेवरी वळघावें सामर्थेसी ॥६॥ तेथूनी ऊर्ध्व छिद्र मुंगी नेत्रातुल्य । त्यांतून उडणें भले चपलत्त्वेंसी ॥७॥ जडतां वळंघितां बरी नारी आपण एक । रनानारी नपुंसक एक रुप ॥८॥ ज्ञानदेव म्हणे जो उडनी जाय तेथ । परब्रह्मीचि मात तोचि जाणे ॥९॥