भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्त्री पुत्र दारा धन । देखोनियां नाचे श्वान

stri putra dara dhan | dekhoniyan nache shvan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्त्री पुत्र दारा धन । देखोनियां नाचे श्वान ॥१॥ जातां बळें कीर्तनीं । बका ऐसा बैसे ध्वनीं ॥२॥ लक्ष ठेउनी बाहेरी । वरवर डोले दुराचारी ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे। श्वानापरि त्याचें जिणें ॥४॥