भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावें उदास । साधुसंतां ऐसें केलें जनीं

stri janma mhanavuni na vhaven udas | sadhusantan aisen kelen janin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावें उदास । साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥ संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥ विदुर सात्त्विक माझिये कुळीचा । अंगिकर त्याचाकेला देवें ॥३॥ न विचारितां कुळ गणिका उद्धरिली । नामें सरती केली तिहीं लोकीं ॥४॥ ऋषींचीं कुळें उच्चारीलीं जेणें । स्वर्गावरी तेणें वस्ती केली ॥५॥ नामयाची जनी भक्तीतें सादर । माझें तें साचार विटेवरी ॥६॥