भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्थापक व्यापक सर्वदेशीं भरला । पाहतां तो भला पंढरीये

sthapak vyapak sarvadeshin bharala | pahatan to bhala pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्थापक व्यापक सर्वदेशीं भरला । पाहतां तो भला पंढरीये ॥१॥ असोनियां नसे नसोनियां असे । योगिया हृदयीं वसे दृष्टीं न पडे ॥२॥ एका जनार्दनीं भुवैकुंठनायक । उभा असे सम्यक विटेवरी ॥३॥