भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय

striputradikin rahila adar | vishayin padibhar atishay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥१॥ आतां सोडवणे धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥ येउनियां आड ठाके लोकलाज । तों हें दिसे काज अंतरलें ॥२॥ तुका म्हणे आम्हां जेथें जेथें गोवा । तेथें तुह्मीं देवा सांभाळावें ॥३॥