भजनी मालिका

भजने

बुजवणें शेतीं माणसें ह्मणती । काय त्याचें हातीम शस्त्र शोभे ॥१॥ हंसाशीं विरोध करीत कावळा । नेणे त्य़ाची कळा उंचपणें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बुडविली क्रिया बुडविलें कर्म । बुडविला धर्म पाहा येणें ॥१॥ तुझिया नामाचें लागलेसें पिसें । असोनि न दिसे लोकाचारीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बुडविली क्रिया बुडविलें कर्म बुडविला धर्म पाहा येणें ।।१।। तुझिया नामाचें लागलेसें पिसें । असोनि न दिसे लोकाचारीं।।२॥

रचनाकार: संत गोणाई

बुडालिया जळीं धावतसे कोण । तैसे प्राणी जन बुडताती ॥१॥ संसार हा डोहो दुस्तर पारखा । सांगड ती देखा रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बुद्धि आणि मन सावध करुन । मन उघडीं लोचन मुल तत्त्वीं ॥१॥ सदगुरुचें दास्य करीं एकभावें । काया वाचा जीवें शरण रिघा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बुद्धिहीन अति करितों हव्यास । उठती दद्देश नाना मतें ॥१॥ एकापुढें एक नासोनियां जाती । सोशिली विपत्ति जन्ममरण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥१॥ आणिकां उपायां कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता हा नाहीं मनुष्यदेह ॥१॥ आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदारा आस धनवित्त ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बुध्दीसि निश्चय नाहीं साचा । तोचि भ्रांतीचा मुळारंभा ॥१॥ तयाचि नांव म्हणिजे वेडें । असोनि पुढें न देखे हित ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंग हें पितळ न देखतां ॥१॥ माझें चित्त मज जवळीच ग्वही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बेडूक म्हणजे चिखलाचा भोक्ता । क्षीर सांडूनि रक्ता गोचीड झोंबे ॥१॥ जयाची वासना तयासीच गोड । प्रेमसुखचाड नाहीं तया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोइ ॥१॥ घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम