भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुडतो भवसागरीं । मज काढीं बा मुरारी

budato bhavasagarin | maj kadhin ba murari

रचनाकार: संत सेना · अभंग
बुडतो भवसागरीं । मज काढीं बा मुरारी ॥१॥ आतां न मानी भार कांहीं। माझी पाही माऊली ॥२॥ करीं जतन ब्रीदावळी । वागविशी ते सांभाळी ॥३॥ मी महादोषी चांडाळ । सेना म्हणे तूं दयाळ ॥४॥