भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुध्दि जिहीं अढळ केली । चरणीं तुमचे निक्षेपिली

budhdi jihin adhal keli | charanin tumache nikshepili

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बुध्दि जिहीं अढळ केली । चरणीं तुमचे निक्षेपिली ॥१॥ तया विसंबाल कैसे । कवळिलेति निजमानसें ॥२॥ प्राणपानांची ही गती । कुंठित केल्या इंद्रियवुत्ती ॥३॥ निळा म्हणे कायावाचा । नेमूनि निर्धारीं तुमचा ॥४॥