भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुडविली क्रिया बुडविलें कर्म । बुडविला धर्म पाहा येणें

budavili kriya budavilen karma | budavila dharma paha yenen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बुडविली क्रिया बुडविलें कर्म । बुडविला धर्म पाहा येणें ॥१॥ तुझिया नामाचें लागलेसें पिसें । असोनि न दिसे लोकाचारीं ॥२॥ नेणों काय कळे तुवां वागविला । संबंध तुटला मज नाम्याचा ॥३॥ बुडविला आचार बुडविला विचार । बुडविडा संसार कुळासहित ॥४॥ आपुलें पारिखें सर्वथा सारिखें । नेणों कवणें सुखें वेडावला ॥५॥ बुडविला मोहों बुडविली ममता । बुडविली अहंता मीतूंपण ॥६॥ हा नेणें वेव्हार कां इंद्र्यांचें सुख । अखंड याचें लक्ष तुझे पायीं ॥७॥ बुडविली कल्पना समूळीं वासना । बुडविली सेवाअ त्रिविध कैसी ॥८॥ हांसे नाचे प्रेमें फुंदतु डुल्लतु । अहर्निशीं गातु नाम तुझें ॥९॥ असोनि नसता केला ये संसारीं । म्यां वाहिला उदरीं तैसा नाहीं ॥१०॥ गोणाई म्हणे देवा त्वां केली निरास । चाळविलें उदास बाळ माझें ॥११॥