भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता हा नाहीं मनुष्यदेह

buddhicha palat dhara re kanhin | maguta ha nahin manushyadeh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता हा नाहीं मनुष्यदेह ॥१॥ आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदारा आस धनवित्त ॥ध्रु.॥ अवचितें निधान लागलें से हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥२॥ यावें जावें पुढें ऐसें चि कारण । भोगावें पतन नरकवास ॥३॥ तुका म्हणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥४॥