भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं

budatan avarin | maj bhavache sagarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥१॥ नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥ आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥२॥ तुका म्हणे दोषी । मी तों पातकांची राशी ॥३॥