भजनी मालिका

भजने

निळिये पेरणी । निळिये वाहाणी । गुणाचीं लेणीं । कृष्णवर्ण ॥१॥ नवलाव गे माय । नवलाव चोज । निळीं निळिमा काज । आकारलें ॥ध्रु०॥

निळिये मंडळीं । निळवर्ण सांवळी । तेथें वेधलिसे बाळी । ध्यानरुपा ॥१॥ वेधु वेधला निळा । पाहे घननीळा । विरहणीं केवळा । रंग रसनें ॥ध्रु०॥

निळिये रजनी वाहे मोतिया सारणी । निळेपणें खाणीं सांपडली ॥१॥ आंगणीं चिंतामणि जळधरु सिंपणी । अमृतसाजणी जीवनकळा ॥२॥

निळी कांच भूमीं खेळे वनमाळी । पाहिलें प्रतिबिंब कृष्णं तया न्याहाळीं ॥१॥ रडूं घेतलें रडूं घेतलें । समजावी यशोदा परी रडूं घेतलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निळें हें व्योम निळें हें सप्रेम । निळेपणें सम आकारलें ॥१॥ नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म । नीळवर्ण आश्रम गुरु देखे ॥ध्रु०॥

निवंत बैसोनि सुखें गाय नाम । भेदाभेद काम परते सांडी ॥१॥ हेचि एक खुण परमार्थ पुरता । मोक्ष सायुज्यता हातां चढे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवांत बैसें तूं अचळ । मन करुनी निश्चळ । नको कांहीं तळमळ । नाम गाय सर्वदा ॥१॥ सोडीं मागिलाची आस । दृढ मना घालीं कास । भक्तिभाव समरस । रामनामीं तूं धरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवांत श्रीमुख पहावें डोळेभरी । तेणें नुरे अंतरीं इच्छा कांहीं ॥१॥ चरणीं ते मिठी घालावे दंडवत । तेणें पुरे आर्त सर्व मनींचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवांतपणें मना चित्तीं तूं चरण । आणिक कल्पना न करीं कांहीं ॥१॥ चिंतीं पां विठ्ठल कायावाचामनें । संसारबंधन तुटेल तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवृत्ति ज्ञानदेव उभे दोहींकडे । सोपान तो पुढें मुक्ताबाई ॥१॥ देहुडे सुरगण थक्त पडिलें लोकां । सुरु केला डंका वैकुंठींचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान सांवता । जनमित्र पढियंता जिवलगू ॥१॥ आसंद सुदामा विसोबा खेचर । नरहरी सोनार आदिकरुनि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरे चित्तीं ॥१॥ निवृत्ति निवृत्ति नाम घेतां । जन्म सार्थक तत्वतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवृत्ति मुक्ताई गोविंद गोपाळ । उठले सकळ स्नानालागीं ॥१॥ राही रखमाई सहसमुदायेंसी । मुनि आणि ऋषि उठावले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्ति मुक्ताईचें करिती समाधान । घेतला सोपान मध्यभागीं ॥१॥ ऐक्य अहिक्याची बैसली एकवटे । विस्तारिलीं ताटें रुक्माईने ॥२॥

रचनाकार: संत नामदेव